जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळुबाबा आश्रम शिंदवड ही शाळा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शिंदवड गावातील निष्काम कर्मयोगी संत जिवनेश्वर काळुबाबा आश्रम परिसरात आहे. सन २००२ साली वस्तीशाळा काळुबाबा आश्रम या नावाने वस्तीशाळा सुरू करण्यात आली. श्रीमती सुनीता संतु पगार या स्वयंसेवी शिक्षिका तिथे अध्यापन करू लागल्या पुढे २००५ साली शाळेचा विस्तार करून श्री समाधान भास्कर गाडे हे दुसरे स्वयंसेवी शिक्षक कार्यरत झाले,सन २००८ साली शाळेचे नियमित शाळेत रूपांतर करण्यात आले. व आजची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळुबाबा आश्रम शिंदवड ही शाळा उदयास आली.