WEL COME

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र....... सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे; सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत… तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा , घाम गळून कमावलेला एकाच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं ! जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी….. सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर… आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू दे - फसवून मिळालेल्या यशापेक्षा,,,, सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्यान भल्यांशी भलाईन वागाव आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा - जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भावू गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यान कामायला हवी पुढे हे ही सांगा त्याला ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं…. पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून , आणि फोलपटं टाकून निकष सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा - हसत राहावं उरातलं दुःख दाबून पण म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस. त्याला शिकवा.. तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला अन चाटुगिरीपासून सावध रहायला. त्याला हे पुरेपुर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून…. पण कधीही विक्रीय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा! धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि , ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्यासाठी पाय रोवून लढत राहा त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य पण धरला पाहीजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत रहा त्याला - आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर. माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे…. पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं. माझा मुलगा - भलताच गॊड छोकरा आहे हो तो. …………………अब्राहम लिंकन

Drop Down MenusCSS Drop Down Menu

RTE- 2009


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९





सदर अधिनियम महाराष्ट्रात १एप्रिल २०१० पासून लागू झालेला आहे. त्याच दिवसापासून ८६ व्या घटनादुरूस्ती नुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याचेही अधिसुचित करण्यात आले.
 या अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षककलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.


कलम क्रमांक २ = व्याख्या.

कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.

कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).

कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.

कलम क्रमांक ६ = शाळा स्थापना .

कलम क्रमांक ७ = आर्थिक व इतर जबाबदाऱ्या.

कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.

कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.

कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.

कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.

कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.

कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.

कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.

कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार. 


कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध . 

कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.  

कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .

कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .


कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये  सुधारणा अधिकार . 

कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .

कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .

कलम क्रमांक  २३ = शिक्षक नेमणूक,अर्हता व अटी शर्ती.


कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.

कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.


कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.

कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.

कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी  प्रतिबंध.

कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मूल्यमापन.

कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता  प्रमाणपत्र.

कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.

कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.


कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.


कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.


कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.


कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.

कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.

कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.


सविस्तर अधिनियम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
DOWNLOAD