प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमात इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांची भाषा व गणित या दोन विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आली होती .तसेच संकलित मूल्यमापन चाचणी -१ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ करीता MSCERT पुणे यांच्या कडून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार होत्या .त्यानुसार पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या .काही अपरिहार्य कारणास्तव संकलित मूल्यमापन चाचणी -१ च्या प्रश्पात्रिका पुरविणे अशक्य असल्याने त्या शाळास्तरावर काढून संकलित मूल्यमापन चाचणी -१ पूर्ण करण्यात आली .आता दुसऱ्या सत्राअखेर संकलित मूल्यमापन चाचणी -२ करावयाचे असून त्याकरीता MSCERT पुणे यांच्याकडून प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत .परंतु त्यापूर्वी विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव व्हावा म्हणून MSCERT ने नमुना प्रश्नपत्रिका त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही दिवसांपासून ते संकेतस्थळ सुरु नसल्याने त्या उपलब्ध होऊ शकत नाहीत .म्हणून त्या प्रश्नपत्रिका आमच्या संग्रहातून आपल्या सोयीसाठी उपलब्ध करून देत आहोत .पुढील लिंक वरून आपण त्या प्राप्त करू शकता .
इयत्ता पहिली
इयत्ता दुसरी
इयत्ता तिसरी
इयत्ता चौथी
इयत्ता सहावी