WEL COME

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र....... सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे; सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत… तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा , घाम गळून कमावलेला एकाच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं ! जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी….. सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर… आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू दे - फसवून मिळालेल्या यशापेक्षा,,,, सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्यान भल्यांशी भलाईन वागाव आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा - जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भावू गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यान कामायला हवी पुढे हे ही सांगा त्याला ऎकावं जनांचं , अगदी सर्वांचं…. पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून , आणि फोलपटं टाकून निकष सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा - हसत राहावं उरातलं दुःख दाबून पण म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस. त्याला शिकवा.. तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला अन चाटुगिरीपासून सावध रहायला. त्याला हे पुरेपुर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून…. पण कधीही विक्रीय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा! धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि , ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्यासाठी पाय रोवून लढत राहा त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य पण धरला पाहीजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत रहा त्याला - आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर. माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे…. पण पहा…… जमेल तेवढं अवश्य कराचं. माझा मुलगा - भलताच गॊड छोकरा आहे हो तो. …………………अब्राहम लिंकन

Drop Down MenusCSS Drop Down Menu

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी/ जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी/ धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी/ एवढ्या जगात माय मानतो मराठी// आमुच्या मनामनात दंगते मराठी/ आमुच्या रगारगात रंगते मराठी/ आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी/ आमुच्या नसानसात नाचते मराठी// आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी/ आमुच्या लहानग्यात रांगते मराठी/ आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी/ आमुच्या घराघरात वाढते मराठी// आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी/ येथल्या फुलाफुलात हासते मराठी/ येथल्या दिशादिशात दाटते मराठी/ येथल्या नगानगात गर्जते मराठी// येथल्या दरीदरीत हिंडते मराठी/ येथल्या वनावनात गुंजते मराठी/ येथल्या तरुलतात साजते मराठी/ येथल्या कळीकळीत लाजते मराठी// येथल्या नभामधून वर्षते मराठी/ येथल्या पिकांमधून डोलते मराठी/ येथल्या नद्यांमधून वाहते मराठी/ येथल्या चराचरात राहते मराठी// पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी/ आपुल्या घरात हाल सोसते मराठी/ हे असे कितीक खेळ पाहते मराठी/ शेवटी मदांध तख्त फोडते मराठी// कवी - सुरेश भट 

 


काळजातला ठेवा


इतिहासाची पाने उलगडताना

जिल्हा परिषद  प्राथमिक  शाळा  काळुबाबा  आश्रम  शिंदवड  ही शाळा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी  तालुक्यात शिंदवड गावातील निष्काम कर्मयोगी संत जिवनेश्वर काळुबाबा  आश्रम परिसरात आहे. सन २००२  साली  वस्तीशाळा काळुबाबा  आश्रम  या नावाने  वस्तीशाळा  सुरू करण्यात आली. श्रीमती सुनीता संतु पगार या स्वयंसेवी शिक्षिका तिथे अध्यापन करू  लागल्या पुढे  २००५  साली शाळेचा  विस्तार करून श्री समाधान भास्कर गाडे हे दुसरे स्वयंसेवी शिक्षक कार्यरत झाले,सन २००८ साली शाळेचे नियमित शाळेत रूपांतर करण्यात आले. व आजची जिल्हा परिषद  प्राथमिक  शाळा  काळुबाबा  आश्रम  शिंदवड ही शाळा उदयास आली. 

 

 

** ब्लॉगनिर्माता **

श्री.समाधान भास्कर गाडे 

प्राथमिक शिक्षक 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूबाबा आश्रम शिंदवड 

ता.दिंडोरी जि.नाशिक 

मोबाइल : ९६३७२२२८१४